Thu. Feb 25th, 2021

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान Smuggling मध्ये अडकणार?

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

राहत फतेह अली खान यांना 2011 मध्ये दिल्लीतील विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली होती.

त्यांच्याकडे 1.24 लाख अमेरिकी डॉलर सापडले होते.

चौकशी दरम्यान इतकी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही.

त्यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय आहे.

‘FEMA’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा तपास EDकडून केला जातो.

सध्या हे प्रकरण EDकडे आहे.

या प्रकरणात EDने आता खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर 300 टक्के दंड आकारला जाऊ शकतो.

भारतात लूक आऊट नोटीस देखील जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *