Sat. Jun 12th, 2021

लाज वाटू द्या, पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा पाक सरकारवर निशाणा

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही पाकिस्तानी विद्यार्थी पाक सरकारला विनंती करून भावूक होताना दिसत आहे. हे विद्यार्थी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे मदत मागत आहे.

हे विद्यार्थी वुहान शहरात फसलेले आहे. यांनी पाक सरकारला विनंती केली की, इथून लवकारत लवकर मायदेशात परत बोलविण्यात यावं असं यात म्हटलं आहे.

हा व्हिडिओ 90 सेकंदाचा आहे. सुरुवातीला या व्हिडिओत तरुणीने नाव सांगून ती पाकिस्तानी असल्याचं सांगितलं आहे.

‘मी पाकिस्तानी आहे. माझ नाव नदीम अबाज आहे. मी हा व्हिडिओ वुहान शहरातून शुट करत आहे.

या तरुणांनी काय आवाहन केलं आहे ?

या शहरात 500 पेक्षा जास्त पाकिस्तानी फसलेले आहे. काही दिवसांपुर्वी माझ्या विद्यालयातील चार विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

या शहरातील अनेक रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यामुळेच आम्ही पाक सरकार दूतावासला विनंती करतो की, आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावे.

येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे, यामुळे इथून आमची सुटका करावी, असे आवाहन या विद्यार्थ्यांनी व्हिडिओतून केलं आहे.

या व्हायरसने हजारो लोक संक्रमित झाले आहेत. अनेक लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हा व्हायरस दिवसेंदिवस पसरत आहे. अद्याप या रोगावर कोणतंही औषध सापडलं नाही.

यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढावे, असं नदीम अबाज या व्हिडिओत सांगत आहे.

भारतातील अनेक विद्यार्थी या इंडियन स्टूडेंट वुहान विद्यालयात शिकतात. या विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणले गेले आहे. तसेच इथून बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनाही घेऊन जाण्यात येत आहे.

एक पाकिस्तानी सरकार आहे की ज्यांना आमच्या बद्दल काहीच वाटत नाही. आम्ही मेलो तरी त्यांना काही फरक पडणार नाही.

पाकिस्तान सरकार लाज वाटायला पाहिजे आणि भारताकडून काही शिकायला पाहिजे.

भारत त्यांच्या नागरिकांची काळजी घेतो आणि मदत करतो. विद्यालयाकडून मेल आला आहे की, तुम्ही चीनमधून जावू शकता. त्यामुळे आम्हाला इथून बाहेर काढा नाहीतर आम्ही मरुन जाणार.

आमचे नातेवाईक आणि आमचे मित्रमंडळी आमची वाट बघत आहे. यामुळे काहीतरी करा आणि आम्हाला यातून बाहेर काढा. असंही तिने यावेळी स्पष्ट केलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *