पालघर मधील समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालघर – काल रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र शेजारील दमण येथे एक स्पीड बोट संशयितरित्या दिसल्याच्या माहितीनंतर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तटरक्षक दल तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

पालघर – काल रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र शेजारील दमण येथे एक स्पीड बोट संशयितरित्या दिसल्याच्या माहितीनंतर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तटरक्षक दल तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सदर स्पीडबोट ही दमण जवळील समुद्रात दिसल्याची माहिती पालघर पोलिसांना आल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांमार्फत देण्यात आलेला आहे . यासाठी समुद्र किनाऱ्यांवर तसंच समुद्रकिनाऱ्या शेजारी असणाऱ्या रस्ते वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर आहे .