Sun. Oct 17th, 2021

विजेच्या धक्क्यानं शेतकरी आणि जनावरांचा मृत्यू; 10 म्हशी ठार

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघर जिल्ह्यातील महावितरणचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

मनोर गावात 10 म्हशींचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रानात चरत असताना म्हशींच्या अंगावर विजेच्या तारा तुटून पडल्यानं ही घटना घडली.

 

तसेच म्हशींच्या मृत्यूने सुनील घरत यांचं फार मोठं नुकसानही झाले. तर, दुसरीकडे वाडा तालुक्यातील सापने गावात विजेची तार कोसळून शेतकऱ्यासह बैलाचा जागीच

मृत्यू झाला.

 

शेतात नांगरणी करताना ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच पालघरमध्ये जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिणीच्या झटक्यानं संजय रापडती यांचा जागीच मृत्यू झाला

होता.

 

महावितरणचा गलथानपणा असाच वाढत राहिला तर विजेचा धक्का लागून बळी जाण्याची शक्यता नाकारू शकता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *