Mon. Aug 15th, 2022

‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

   सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम यांच्या भूमिकेमुळे सर्वच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. भाऊ कदम यांच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून भाऊ कदम नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. आता भाऊ कदम ‘पांडू’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

  गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर ‘पांडू’ चित्रपटाची चर्चा होत आहे. त्यानंतर आता त्यांच्या ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विजू माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर झी स्टुडिओने पांडू या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

  ‘पांडू चित्रपटात दोन मित्रांची कथा दाखवण्यात येणार आहे. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे दोन लोककलावंत दाखवण्यात आले आहे. एक दिवस या दोघांनाही मुंबईत हवालदाराची नोकरी लागते. पांडू साधाभोळा दाखवला आहे तर महादू चतुर दाखवण्यात आला आहे. तसेच मुंबईचे आयुष्य जगताना पांडूच्या आयुष्यात एक उषा नामक मुलगी येते. पांडू साधाभोळा असल्यामुळे उषा त्याच्या प्रेमात पडते.’ असे ‘पांडू’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

  ‘पांडू’ चित्रपटात भाऊ कदम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर विनोदी अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटात झळकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.