Sat. Feb 29th, 2020

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर पंकजा मुंडेंचं सोमवारी लाक्षणिक उपोषण

माजी मंत्री पंकजा मुंडे सोमवारी 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण आणि भाजपच्या बॅनरखाली हे उपोषण करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

हे लाक्षणिक उपोषण औरंगबादमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

उपोषण कशासाठी ?

मराठवाड्याच्या गंभीर असलेल्या प्राणी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेता देंवेद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.

तसेच हरिभाऊ बागडे, रावसाहेब दानवे आणि प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित असणार आहेत.

मराठवाड्याचे हक्काचे  पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन आणि मराठवाड्यातील प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे, हे या उपोषणाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.

मराठवाड्यातील जनतेला आवाहन

पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील जनतेला आवाहन केलं आहे.

या विविध मागण्यांसाठी जनतेने सहकार्य करावे, तसेच सहभागी होण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *