घर फुटण्याचं दुःख भोगलंय- पंकजा मुंडे

“राजकारणात घर फोडण्याचं पातक लागेल, एवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं. आम्ही असं कधीच करत नाही. असाच प्रसंग आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आला होता. पण मी जयदत्त क्षीरसागर यांच्याबरोबर राहिले. कारण मी घर फुटण्याचं दुःख भोगलंय.” असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता लगावला. यावेळी व्यासपीठावर राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“… त्यांना बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून देऊ”
पूर्वी रस्ते कागदावर व्हायचे.
अधिकाऱ्यांना कोंडून सह्या घेतल्या जायच्या.
मात्र आम्ही हे सगळं बदललंय.
डोळ्यांना काम दिसतंय, हे समाधान देणारं आहेत.
राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात राजकारणाचं बीज पेरलं, पण विकासाचं बीज पेरलं नाही.
विकासाला आडवं येतील त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून देवू.
असा टोला पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला लगावला..
प्रीतमताईंना कोण टक्कर देणार?
आम्ही राजकरणात असून राजकारणाचं नाटक अजून सोडलेलं नाही.
बीड जिल्ह्याचे लोक हे नाटक बघत आहेत.
यांचा पडदा कधी उघडतो आणि खासदारकींचा राष्ट्रवादीचा उमेदवार कधी येतो, यांची वाट पाहत आहेत.
प्रीतमताईंना कोण टक्कर देणार, हा राष्ट्रवादीसमोर खूप मोठा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार येतोय, त्यावर नाटक रंगेल…
बीड शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी.देशमुख, भीमराव धोंडे, माजी आ. बदामराव पंडीत, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
दुष्काळात मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
चारा छावण्यांच्याबाबतीत काही बदल करावे लागले, तर जनावरं जगवण्यासाठी नक्की करू.
जनावरांची वैरण जनावरांना मिळायला हवी
अन्नधान्यची कुठेही कमतरता पडणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत
दुष्काळाचं आव्हान तीव्र आहे. पण आमची इच्छाशक्ती आहे.
म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही, असं ते म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्यात
शहरात 168 कोटी रुपयांची ‘अटल भूयारी गटार योजना’,
88 कोटी रुपयांच्या नवीन 16 डीपी रोडचं बांधकाम,
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 448 घरांची निर्मिती,
नगर परिषदेच्या सभागृहाचं स्व.गोपीनाथराव मुंडे नामकरण
या कार्यक्रमात नुकताच बीड जिल्ह्याच्या दोन भूमीपुत्रांना भारत सरकारच्यावतीने ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला, ते डॉ. वामन केंद्रे व शब्बीर शेख यांच्यासह कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकटपटू सचिन धस यांचा मुख्यमंत्र्यांच्या गौरव सत्कार करण्यात आला.