बीडच्या वेशीत रेल्वे आणून आम्ही वचनपूर्ती केली- पंकजा मुंडे

राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘अहमदनगर बीड परळी’ या रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी केली. ‘बीडच्या वेशीत रेल्वे आणून आम्ही वचनपूर्ती केली असून माझ्याच कार्यकाळात रेल्वे बीड पर्यन्त जाईल’, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी दर्शवला.
आष्टी तालुक्यातील कडा येथे रस्ते भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी रेल्वे रुळांची पाहणी केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीतील जाहीर सभेत रेल्वे बीड पर्यंत घेऊन येऊ. एवढंच नव्हे, तर रेल्वेमध्ये बसून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करू असं म्हणणाऱ्या मुंडेंसाठी येत्या निवडणुकीत रेल्वे हा मुद्दा कळीचा असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वेची स्वप्न दाखवत निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र रेल्वे काही बीडला आली नाही. मात्र भाजप सरकारच्या कालावधीत बीड जिल्ह्याच्या सीमा रेषेत प्रवेश केल्याचा आनंद पंकजा मुंडे यांनी व्यक्त करत आहेत. आज त्यांनी कडा येथील रेल्वे रुळांची पाहणी केली. त्यावेळी आष्टीचे आमदार भीमराव धोंडे आणि माजी मंत्री आ सुरेश धस हे सोबत होते. त्यामुळे या जिल्ह्य़ाच्या अस्मितेचा प्रश्न आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची डोके दुःखी ठरणार आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.
आज परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबरच जिल्हा वासियांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पुर्णत्वास येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. pic.twitter.com/V8CSbakIt3
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) January 16, 2019
आपले वडील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबरच जिल्हावासीयांचं गेल्या कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्णत्वास येत असल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केलं.