शिरूरमध्ये नकुशीला सोडलं रस्त्यावर

‘आज वर्ल्ड डॉटर्स डे’ असताना देशात मुलगी वाचवा, देश वाचेल असा नारा सुरू आहे. तर दुसरीकडे शिरुर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच चिमुकलीला सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं ?
शिरुरमधील निमोणे गावात जन्मदात्यांनीच चिमुकलीला वाऱ्यावर सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
स्थानिक नागरिकांच्या कानावर चिमुकलीचा रडण्याचा आवाज पडल्यामुळे तिला सोडून गेल्याची माहिती मिळाली.
स्थानिक नागरिकांच्या माध्यामतून चिमुकीला प्रथमोपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
शिरुर पोलिसांनी अज्ञात जन्मदात्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तसेच पोलीस चिमुकलीच्या पालकांचा तपासही घेत आहे.