आई-वडिलांनीच केली पोटच्या ३ मुलांची विक्री

नवी मुंबईमध्ये जन्मदात्यांनीची आपल्या ३ मुलांची विक्री केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलांना विकण्यासाठी आई-वडिलांनी २ लाख ९० हजार रुपये घेतले असल्याची माहिती, महिला व बालविकास विभागाने उघड केली आहे.
पोलिसांनी स्वत:च्याच मुलांची विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले असून बाबा फरार झाले आहेत. या आई-वडिलांनी दोन मुली आणि एका मुलाची २ लाख ९० हजार रुपयांत विक्री केली असून पोलिसांनी या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे तर तिसऱ्या मुलाचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत.
नेरूळ रेल्वेस्थानकातील फलाटावरहे कुटुंब राहत असून शारदा शेख या (वय ३०) या महिलेने गरोदर असतानाच आपल्या बाळाची २ लाख रुपयांना विक्री केली होती. हे बाळ अवघे २८ दिवसांचे आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून पिता मात्र फरार आहे. नवी मुंबई पिता आणि बाळाचा शोध घेत आहेत.