Thu. Oct 22nd, 2020

‘पर्रिकर’ एक आदर्श व्यक्तिमत्व – सुमित्रा महाजन 

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या 63 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती शनिवारपासून खालावली होती. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात आणि अनेक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. देशाने आदर्श व्यक्तिमत्व गमावले आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. गेल्या वर्षी पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर अनेक उपचारही करण्यात आले होते. या कर्करोगावर मनोहर पर्रिकर यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.

‘पर्रिकर’ एक आदर्श व्यक्तिमत्व – सुमित्रा महाजन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

राजकीय वर्तुळात तसेच इतर क्षेत्रातही दुख व्यक्त केलं जात आहे.

इतक्या मोठ्या आजाराचे निदान झाल्यानंतरही पर्रिकर शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.

तसेच त्यांच्या या लढाऊ वृत्तीमुळे मनोहर पर्रिकर शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते.

तू तुझं काम कर, मी माझं काम करतो असंच मनोहर पर्रिकरांनी आजाराला म्हटलं होतं

पर्रिकरांच्या व्यक्तीमत्वाचे नेहमी कौतुक वाटतं असेही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या अशा अनोख्या शैलीमुळे तरुण पिढी त्यांची मोठी फॅन होती.

तसेच राजकारणात येणारी पुढची तरुण पिढीने पर्रिकरांचा आदर्श घ्यावा असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *