Thu. Apr 22nd, 2021

#WeMissManoharParrikar ‘मनोहर’ पर्वाचा अंत

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकरांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी गोवेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्रिकरांच्या पार्थिवावर मिरामार समुद्रकिनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मोठे नेते हजर होते. नेव्ही बॅंड पथकाने शोक धून वाजवत पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देण्यात आला. तसेच सैन्य दलाने सुद्धा पर्रिकरांना मानवंदना दिल्या. अंत्यसंस्कार देताना ‘मनोहर पर्रिकर अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या.

पर्रिकरांचा अखेरचा प्रवास –

मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाला.

त्यांच्या पार्थिवावर मिरामार समुद्रकिनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गोवेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

साधेपण जपणारा सच्चा माणूस हरपल्यामुळे गोवेकर पाणावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शाह, गिरीश महाजन, विनोद तावडे असे अनेत नेते हजर.

पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.

अंत्यदर्शन घेतल्यानंतर मोदींनी पर्रिकरांच्या परिवाराचं सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *