Sat. Oct 24th, 2020

भाडं नाकारल्याच्या रागातून टॅक्सी ड्रायव्हरवर अनैसर्गिक बलात्कार

मुंबईत गरजेच्या वेळी रिक्षा किंवा टॅक्सीने भाडी नाकारण्याचा अनुभव सर्वांनाच आला असेल. मात्र या रागातून थेट टॅक्सी ड्रायव्हरवर (Taxi Driver) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

काय घडलं नेमकं?

शनिवारी 11 जानेवारी रोजी रात्री एक RPF शिपाई आपली सेकंड शिफ्ट संपवून घरी जात होता.

त्यावेळी डीमेलो रोडवर त्याने एक टॅक्सी (Taxi) थांबवली.

आपल्याला ग्रॅंट रोडला जायचं असल्याचं सांगून टॅक्सीवाल्याला ग्रँट रोडपर्यंत सोडण्यास सांगितलं.

मात्र टॅक्सी ड्रायव्हरने (Taxi Driver) जाण्यास नकार दिला आणि तो टॅक्सी सुरू करून निघू लागला.

शिपायाला राग अनावर झाला आणि त्याने टॅक्सी अडवली.

ड्रायव्हरला बाहेर काढलं. त्याला रेल्वे हद्दीत नेऊन मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता त्यांच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला.

त्यानंतर त्याला त्याच अवस्थेत तिथे सोडून त्याच्याजवळील सगळे पैसे तसंच टॅक्सीची चावी घेऊन RPF शिपाई निघून गेला.

पीडित ड्रायव्हरने या घटनेची तक्रार पोलिसांत केली.

पोलिसांनी या प्रकरणी अमित धनकवडे या RPF शिपायाला अटक केलं आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *