Fri. Dec 3rd, 2021

आणखी २५ रुपये मोजा, आणि मेट्रोत फिरा अनलिमिटेड

मुंबई मेट्रो-१ ने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो-१ ने प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठीच ही महत्वाची बातमी आहे.

आता मेट्रोच्या नव्या योजनेनुसार पासधारकांना अधिकचे २५ रुपये मोजून अमर्याद फिरता येणार आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर, लोकल रेल्वे प्रमाणेच मेट्रोच्या मासिक पासवर हवं तेवढ फिरता येणार आहे. याबातची माहिती मेट्रोने ट्विटद्वारे दिली आहे.

मेट्रोच्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार आहे. मेट्रो पासधारकांना या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

यानंतर हंव तेवढ्या वेळेस पासधारकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पासधाराकांना आता मासिक पाससाठी १४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

परंतु ही नवी योजना आगामी सहा महिन्यांसाठीच असणार आहे.

याआधी ४५ फेऱ्यासांठी प्रवाशांना १३७५ रुपये मोजावे लागत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *