Mon. Jan 25th, 2021

अलिबागमध्ये काल पार पडली मिरवणूक आणि आज बघा काय घडले?

ही दृश्यं आहेत अलिबाग समुद्र किनार्‍यावरील आजच्या सकाळची म्हणजेच सोमवारी सकाळी ६:३० वाजताची अवघ्या ५-६ तांसापूर्वी याचं अलिबाग समुद्र किनार्‍यावर हजारो माणसं गणपती विसर्जनात दंग होती.

alibagmirvnuk1.png

मात्र विसर्जनानंतर इतका स्वच्छसुंदर समुद्र किनारा पाहून यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण या ठिकाणी, ना निर्माल्याचा पसारा, ना प्लास्टीकचा कचरा ना कोणतीही अस्वच्छता आढळली.

alibagmirvnuk2.png

हे सर्व लक्षात घेता कदाचित त्यांच्यातल्या माणूसपणावर आपला विश्वास दृढ होईल चक्क इतका निटनेटकेपणा या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळाला.

alibagmirvnuk3.png

 

या ठिकाणी कालच्या विसर्जनाच्या मिरवणूकतही नागरिकांच्या शिस्तबद्धतेचं दैवी दर्शनचं जास्त लोभसवाणं होत. इथे ना डीजेचा धिंगाणा, ना हिडिस नृत्यं असा कोणताही प्रकार इथे आढळला नाही.

alibagmirvnuk4.png

 

या शिस्तीचं सारं श्रेय अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांचं नियोजन, तसेच त्याला साथ देणारं पोलिस पथक आणि प्रशासन यांना जाते.

अर्थातच ही माणसं खर्‍या अर्थाने अलिबागचे सुजाण नागरिक आहेत असं म्हणणे नक्कीच वावग ठरणार नाही.

alibagmirvnuk5.png

 

हायकोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून डीजेच्या दणदणाटात, आचविचकट नृत्याने विसर्जन मिरवणूकीला पाशवी स्वरुप देणार्‍या, हा राजा मोठा की तो राजा मोठा, ही पेठ मानाची की ती पेठ या हमरातुमरीने गाजणार्‍या मोठ्या शहरांतील विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अलिबागच्या या मिरवणूकांनी आपले वेगळेपण दाखवले आहे.

alibagmirvnuk6.png

या तथाकथित मोठ्या शहरातील नागरिकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कुठल्यातरी सिनेमातील डायलॉगचा आधार घेत अलिबागवर हिणकस विनोद करण्यापेक्षा याबाबतीत अलिबागचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला नक्कीच हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *