Sat. Jan 16th, 2021

रमजानच्या महिन्यात कामावर जाता मग … – ओवेसी

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदयाने निवडणुकांच्या तारखा रमजान महिन्यात येत असल्यामुळे मतदान करता येणार नाही म्हणून निवडणुकांच्या तारखा पुढे ढकालवेत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम समुदायने घेतलेल्या आक्षेपावर खडेबोल सुनावले आहे. रमजानच्या महिन्यात लोकं कामावर जाऊ शकतात, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

ओवेसी काय म्हणाले ?

पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम समुदयाने निवडणुकींच्या तारखांचा आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानच्या तारखा रमजान महिन्यात येत असल्यामुळे निवडणुकीच्या तारखा पुढे ढकल्याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे.

रमजान महिन्यात मुस्लिम समाज रोजा करतो त्यामुळे ते मतदान करायला जाऊ शकत नाही.

तसेच या तीन राज्यात अल्पलसंख्यकांची लोकसंख्या जास्त असून त्यांनी मतदान करू नये अशी भाजपाची इच्छा आहे, असे मुस्लिम नेत्यांचे म्हणणे आहे.

मात्र जर कामावर जाऊ शकतात तर मतदान करण्यास का नाही जाऊ शकत असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

तसेच निवडणुकांच्या तारखांवरून उगाच वाद करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. रमजानमधील निवडणुकांचा काहीही आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

रमजान महिन्यावरून राजकारण करू नका असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच रमजान असल्यामुळे निवडणुकींच्या मतदानावर काही परिणाम होणार नाही आणि हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रमजान असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह जास्त असल्यामुळे मतदान जास्त होईल असे ओवेसींचे स्वत: चे मत आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *