Wed. Mar 3rd, 2021

‘कोरोना’ची हेअर स्टाईल आणि भन्नाट ‘कोकणी मास्क’

सोशल मिडीयावर कोरोनासंदर्भातील विनोदांना उधाण

कोरोनासारख्या भयंकर व्हायरसला संपूर्ण जग घाबरलंय. सर्वजण कोरोनाला गाभीर्याने घेत आहेत. असं असतांना सोशल मिडीयावर मात्र कोरोनासंदर्भातील विनोदांना उधाण आलं आहे. कोरोनामुळे अनेकजण स्वत:ची काळजी घेतांना दिसत आहेत. तर काहीजण तर कोरोनाला विनोदाचा भाग समजताय.

कोरोनावर विविध गाणे, कविता, मिम्स, जोक्स, हे सगळं सोशल मिडीयावर व्हायरल होतयं. अनेकांनी तर कोरोनाच्या मजेशीर व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल देखील केल्या आहेत. तर अनेकांनी स्वतःच्या ड्रेसवर मॅचिंग आणि वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क वापरायला सुरुवात केलीय.

हे सर्व सुरू असतांनाच आता तर कोरोना व्हायरसच्या हेअर स्टाईलचा ट्रेंड आलाय. आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या चित्रपटातील अभिनेत्याच्या हेअर स्टाईलचं लोकांनी अनुकरण करत त्या हेअर स्टाईलचा ट्रेंड आलेला बघीतला असेल. सलमान खानचा ‘तेरे नाम’ चित्रपट आल्यानंतर त्या चित्रपटातील सलमान खानची हेअरस्टाईल तर खूपच लोकप्रिय झाली होती.

मात्र आता जीवघेण्या ठरलेल्या कोरोनाचीच हेअर स्टाईल अनेक जण करत असून केलेल्या हेअर स्टाईलचे फोटोही सोशल मिडीया टाकत आहेत.
कोरोना व्हायरसच्या हेअर स्टाईलमध्ये एका मुलाने डोक्यावरील समोरचे केस तसेच ठेऊन मागील बाजूस असलेले केस बारीक करून त्यावर ‘कोरोना विषाणू’कोरलाय. अशी ही हेअर स्टाईल सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आणि एका दुसऱ्या फोटोत तर एकाने नारळाच्या करवंटीचा ‘कोकणी मास्क’तयार केला आहे. हे करवंटीचे मास्क सध्या सोशल मीडियावर ‘कोकणी मास्क’ म्हणून चांगलेच व्हायरल होतेय. दरम्यान, एकीकडे कोरोना व्हायरस गंभीर म्हणून पाहिला जातोय तर दुसरीकडे कोरोनाकडे विनोद म्हणून बघीतंल जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *