12 जुलैला देशातील पेट्रोल पंप बंद? 5 जुलैपासून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
12 जुलै रोजी देशभरातील सर्व पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने राष्ट्रव्यापी पेट्रोल पंप बंदची हाक दिली आहे.
पेट्रोलचे दर दररोज बदलत असल्याने त्यात अपारदर्शकता असल्याचे एआयपीडीएने म्हटले.
दररोज बदलणाऱ्या दरांबद्दल संरक्षण देण्याची भूमिका इंधन विक्रेत्या कंपन्यांनी घेतली असली, तरी याबद्दल त्यांनी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही.
इंधन विक्रेत्या कंपन्यांनी 30 जूनची मुदत मागितली होती. मात्र ही मुदत टळून गेल्यावरही कोणताही तोडगा निघालेला नाही. याचाच निषेध म्हणून 5 जुलैपासून पेट्रोल
खरेदी न करण्याचा निर्णय डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.