Mon. Aug 10th, 2020

पिंपरी चिंचवडमध्ये एटीएमफोडीचे सत्र सुरुच

पिंपरी चिंचवड : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील एटीएम फोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. मेहेत्रे वस्तीतील चिखलीत एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना 12 डिसेंबरच्या मध्यरात्री 4 च्या दरम्यान घडली. फोडलेले एटीएम आयसीआयसीआय बँकेचे होते. एटीएम फोडताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

मध्यरात्री दोनच्या दरम्यान एकाने पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएमची रेकी केली. यानंतर दोन तासांनी म्हणजेच रात्री 4 च्या दरम्यान तीन जण एटीएम सेंटरमध्ये शिरले. यानंतर चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील असलेला सीसीटीव्ही बाहेरच्या दिशेने फिरवला.

यानंतर त्यांनी एटीएम मशीनच्या समोरच्या भागाची तोडफोड केली. पण त्यांना यश आले नाही. हे चोर स्थानिक असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चिखली परिसरातील एटीएमटी फोडीची ही महिन्याभरातली दुसरी घटना आहे. तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडली होती. त्यामुळे या भागातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न पु्न्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *