Jaimaharashtra news

अपक्ष नगरसेवक प्रवीण शांताराम गोरे यांचे अपहरण

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी-चिंचवडमधील चाकणच्या राजकारणाने भलतेच वळण घेतले.

 

चाकण नगरपरिषदेचे  अपक्ष नगरसेवक प्रवीण शांताराम गोरे यांचे अपहरण करण्यात आले.

 

अशी तक्रार त्यांच्या भावाने चाकण पोलिसात दाखल केली. याप्रकरणी संशयीत आरोपी मंदार देशमुख यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आरोपी मंदार देशमुख हे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वृषाली देशमुख यांचे दीर आहेत.

 

चाकणमध्ये सध्या नगर परिषदेत नगराध्यक्ष निवडीची प्रकिया सुरु आहे.

 

येत्या 14 जुलैला या निवडणूका पार पडणार आहे. निवडणूकीत विरोधात मतदान केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशी माहिती फिर्यादीत नमूद करण्यात

आली.

Exit mobile version