व्हॉट्सअपच्या मदतीने सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

व्हॉट्सअपच्या मदतीने पोलिसांना सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीसांनी या सराईत चोराला व्हॉट्सअपच्या मदतीने अटक करण्याची कामगिरी केली आहे. रोहीत घमंडे असं अटक करण्यात आलेल्या सराईत चोराचं नाव आहे.
हा चोरटा साथीदारांच्या मदतीने विविध राज्यात अगदी शिथाफीने चोरी करत होता. महाराष्ट्रसह, हैदराबाद आणि गुजरातमध्ये देखील या चोराने डल्ला मारला होता.
या सराईत अट्टल गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील युनिट 1 च्या टीम ने बेड्या ठोकल्या आहे.
या गुन्हेगारांवर विविध राज्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच पिंपरीतील चोरीचा मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला आहे.
या चोरट्याने डिसेंबर महिन्यात भरदिवसा सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज लंपास करून धूम ठोकली होती.
दरम्यान हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला त्यानुसार तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन व नॅशनल क्राईम डिटेक्शन ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तपास करीत रोहीत घमंडे याला गुजरातमधून अटक करण्यात आली.
त्याच्यावर विविध राज्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. अद्याप, चार साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.