आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही; पंतप्रधान मोदींनी कट्टरतावाद्यांना सुनावले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देश एकता, शांती आणि सद्भावनेवर चालतो, आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना सुनावले
आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मोदींनी देशवासियांना संबोधित केले.
सरकारच्या विकासकामांची माहिती यावेळी मोदींनी दिली. या भाषणात मोदींनी लोकमान्य टिळकांचा देखील उल्लेख केला तसच तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी आपण
नवा भारत घडवुया असं आवाहन देखील त्यांनी केलं. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षातलं मोदींचं हे सगळ्यात कमी वेळाचं भाषण ठरले.
गेल्या वर्षी 96 मिनीटांचं मोदींचं भाषण झालं होतं या वर्षी मोदी फक्त 57 मीनीटचं बोलले.