पंतप्रधान मोदींची गुरूवायूर मंदिरात पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या त्रिचूर जिल्ह्यातल्या गुरुवायूर मंदिरात दाखल झाले आहेत. या मंदिरात ते विशेष पूजा करणार आहेत. नरेंद्र मोदी पांरपारीक वेशभूषेत मंदिरात पोहोचलेत. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला गेलाय. गुजरातचे मुख्यमंत्री असतांनाही नरेंद्र मोदी या मंदिरात दर्शनासाठी आले होते.
काय आहे गुरूवायूर मंदिराचं वैशिष्ट्य?
गुरूवायूर मंदिराला मोठा इतिहास आहे.
हे मंदिर प्राचीन आहे.
हे देशातील चौथं सर्वांत मोठं मंदिर आहे.
या मंदिराच्या गर्भगृहात बाळगोपाळाची मूर्ती आहे.
गुरूवायूरला ‘केरळची द्वारका’ तसंच ‘भूलोकीचं वैकुंठ’ म्हटलं जातं.
या मंदिरात दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं.
ഗുരുവായൂര് ക്ഷേത്രം ദിവ്യവും പ്രൗഢഗംഭീരവുമാണ്. ഇന്ത്യയുടെ പുരോഗതിക്കും സമൃദ്ധിക്കും വേണ്ടി ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഈ ക്ഷേത്രത്തില് പ്രാര്ത്ഥിച്ചു pic.twitter.com/fQpK3JWuB7
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2019
पीएम मोदी नेव्हीच्या हेलीकॉप्टरने मंदिरात पोहोचले. या केरळ दौऱ्यासाठी पंतप्रधान शुक्रवारी रात्री कोच्चीला आले. येथील ‘एर्नाकुलम गेस्ट हाउस’ मध्ये त्यांनी वास्तव्य केलं. मंदिरात पूजा केल्यानंतर ते लोकांना संबोधित करणार आहेत.
त्यानंतर 2 वाजता दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर आजच मालदीव आणि श्रीलंका दौरा करण्यासाठी मोदी निघणार आहेत.
पंतप्रधान केरळच्या दौऱ्यावर असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.