Fri. Dec 3rd, 2021

पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयानुसार आज ९.५कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आतापर्यंत १.१५ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

आपले नाव कसे तपासाल?

  • PMkisan.gov.in वर LOGIN करा.
  • ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’ हा ऑप्शन मिळणार आहे.
  • ‘Beneficiary List’ च्या बटणावर क्लिक करा.
  • या पेजवर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचे गाव निवडा.
  • ‘Get Report’ वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *