Thu. Mar 4th, 2021

१४ एप्रिलला सकाळी १० वाजता पंतप्रधान करणार देशाला संबोधित

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळेअनेक राज्यांनी हा लॉकडाऊन वाढवण्यासची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे १४ एप्रिल रोजी पंतप्रधान सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता ते काय घोषणा करणार आहेत, याकडे सर्व देशाचं लक्ष आहे.

११ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींनी चर्चा केली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बोलण्यात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. ओदिशा तसंच महाराष्ट्रात लॉकडाऊन आधीच वाढवण्यात आला आहे. आता १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे यावेळी कोणती घोषणा ते करणार आहेत, याबद्दल लोकांना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *