Fri. Jan 21st, 2022

१४ ऑगस्ट आता फाळणी यातना स्मृती दिन

रविवारी संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी यातना स्मृती दिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.

देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत १४ ऑगस्टला ‘फाळणी यातना स्मृती दिन ‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत. लाखो लोकांना यावेळी स्थलांतर करावे लागले होते. माहितीनुसार, जगातील हे सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक होते. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद होता. पण, त्याचवेळी भारत-पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात असे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन्ही बाजूंनी हिंसा झाली. यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस फाळणी यातना स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *