Wed. Jan 19th, 2022

राम मंदिरासंदर्भात पंतप्रधानांचं लोकसभेत निवेदन

राम मंदिरावर (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यासाठी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करणार असल्याचंही मोदींनी निवेदनात स्पष्ट केलं.

राम मंदिराची योजना तयार असल्याचं मोदींनी लोकसभेत सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने श्रीराममंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यासही मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांनी यावेळी ‘पुन्हा सबका साथ, सबका विकास’ चा नारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *