Wed. Jan 19th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने उजाळा दिला. मिल्खा सिंग यांना कोणीही विसरू शकत नाही असं म्हणत मोदींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मिल्खा सिंग यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली होती. दृढ निश्चय, बुद्धीमत्ता, स्पोर्ट्स स्पिरिट जेव्हा एकत्र येतात, तेव्हा मिल्खा सिंग यांच्यासारखा माणूस घडतो असंही पंतप्रधान म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधवचं मोदींनी कौतुक केलं. ‘तो उत्तम तिरंदाज आहे. प्रवीण जाधवचे पालक मजुरीचं काम करतात आणि आता त्यांचा मुलगा टोकियोला पहिला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्याच्या पालकांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे’, असं मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील भीमपूर जिल्ह्यातील गावकऱ्यासोबत चर्चा करताना पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाबाबत विचारणा केली. गावकऱ्यांनी लस न घेतल्याचं कळल्यावर पंतप्रधान मोदी यांनी माझ्या आईने आणि मी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले.

‘जर मनात भीती असेल तर ती काढून टाका. संपूर्ण देशातील ३१ कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे. मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी लास घेतल्यानंतर ताप येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे. लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्ही स्वत:लाच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावालासुद्धा धोक्यात टाकता. गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि १८ वर्षांवरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *