Sun. Feb 28th, 2021

अखेर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित

लोकसभा निवडणुकांमुळे कित्येक महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित चित्रपट पीएम नरेंद्र मोदी प्रदर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी विरोधकांनी मागणी सर्वोच्च न्यायलयात केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास मंजूरी दिल्यानंतरही निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती.

नेमकं प्रकरण काय ?

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे.

मोदींच्या जीवनावर अधारित चित्रपट पीएम नरेंद्र मोदी काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित होणार होता.

मात्र लोकसभा होईपर्यंत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली होती.

विरोधकांनी ही मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नसल्याचे म्हटलं होतं.

मात्र निवडणूक आयोगाने आक्षेप घेत मंजूरी दिली नाही.

लोकसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

24 मे म्हणजे आजच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय साकारत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *