Mon. Jan 17th, 2022

पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

कोरोनाचा डेल्टा वेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पंतप्रधानांच्या या बैठकीत तामिळनाडू, ओडिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्र आणि केरळमधील रूग्णांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

‘आपल्याला पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅक आणि टीका याच्या ‘चार टी’ रणनीतिवर पुढे जावं लागणार आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले.

 

काय म्हणाले पंतप्रधान?

  • जिथे रुग्ण वाढतायत तिथे पावलं उचलणे आवश्यक
  • महाराष्ट्र आणि केरळमध्ये स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही
  • मायक्रो कंटनेमेंट झोनच्या कठोर अंमलबाजणीनं चांगला अनुभव
  • लसीकरण हा प्रभावी उपाय
  • अनेक राज्य आरटीपीसीआर टेस्टिंगच्या क्षमता वाढण्य़ासाठी प्रयत्न करतायत ही चांगली बाब
  • केंद्र सरकारनं २३ हजार कोटींचं एक हेल्थ पॅकेज जाहीर केले आहे
  • ग्रामीण भागावर आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक
  • मिशन मोडमध्ये अधिकारी नेमून १५ ते २० दिवसात पीएसए ऑक्सिजन प्लांटचं काम पूर्ण करा
  • युरोपातील देशांसारखी स्थिती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणे आवश्यक
  • महाराष्ट्र, केरळमधील कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *