Tue. Sep 28th, 2021

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल

कलम 409,420,465,466,471,120(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMC

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर आरबीआयने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत . पीएमसी बॅंकेवर बॅंकिंग नियमन कायदा 35 अ अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे नवीन कर्ज देणे तसेच ठेवी स्वीकारण्यासह गोष्टींवर निर्बंध असणार आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 जणांवर गुन्हा दाखल

पीएमसी बँकेचा  4335 कोटींचा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भांडुपमधील पीएमसी बँकेतील  रकमेची परतफेड होतं नसल्याचे RBI पासून लपवण्यात आले. तसेच कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख सादर करण्यात आला आहे. असे आरोपही करण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात असं घडल्यामुळे खातेदारांची चांगलीच गैरसोय झाली आहे. त्यामुळे अनेक खातेदारांनी आंदोलन केली. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. RBI च्या आदेशावरुन एचडीआयएल आणि बँकेच्या दहा पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांविरुद्धात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटाळयातील रक्कम बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरली असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कलम 409,420,465,466,471,120(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *