#LockDown | विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

कोरोना विषाणूचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. हाच पादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात आणि देशातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात जनतेने बाहेर फिरु नये, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातंय. मात्र या आवाहनला जनतेकडून पायदळी तुडवलं जातं आहे.
या लॉकडाऊनच्या काळात काही अतिउत्साही पुणेकर रस्त्यावर गाड्या घेऊन उतरत आहेत. या अशा अतिउत्साही पुणेकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांनी मंगळवारी तब्बल 616 जणांच्या वाहन जप्तीची कारवाई केली आहे. तर 1 हजार, 410 जणांवर कारवाई करुन नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई केल्यानंतर देखील काही अतिशहाणे लोकं घराबाहेर पडत आहे.
दरम्यान कोरोनाचा पादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 300च्या पार गेला आहे. त्यामुळे हा वाढता आकडा चिंतेत भर घालणारा आहे. त्यामुळे जनतेने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचा आवाहन जनतेला केलं आहे.