Fri. Jan 21st, 2022

शेतकरी बापलेकीला पोलिसांची अरेरावी, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्साठी आलेल्या शेतकरी आणि त्याच्या मुलीला पोलिसांनी हटकलं आहे. या शेतकरी पितापुत्रीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

पनवेलमधील देशमुख हे शेतकरी आहेत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे.

त्यांच्यासोबत कर्जासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. परंतु त्यांना आत जाण्यापासून पोलिसांनी रोखले.

पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी मला ठार मारणार का ?, असा सवाल त्या शेतकऱ्याने केला.

यानंतरअधिक चौकशीसाठी त्यांना स्थानिक खेरवाडी पोलिस स्थानकात नेण्यात आले.

यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्याला माध्यमांसोबत बोलण्यापासून अडवले.

या सर्व प्रकरणावरुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक करणं चुकीचं असल्याचं बच्चू कडू म्हणाले. शेतकरी असो की सामन्य नागरिक मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घ्यायलाच हवी, असेही कडू म्हणाले.

प्रशासनाकडूल झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी वेळ आली तर मी स्वत: मंत्रालयाबाहेर खूर्ची टाकून बसेल

अशी वेळ परत आली तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन, असे बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *