Thu. Jan 20th, 2022

बोगस लसीकरण करणाऱ्याला पोलिसांनी केले अटक

मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे . आरोपी राजेश याने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोरोनाची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होते . सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती. आरोपी राजेश पांडे हा फरार होता तो बारामतीत एका लॉजवर असल्याचे समजताच त्याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *