शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; पोलिसांच्या तक्रार पेटीत तक्रार

राज्यात मुलीवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे चक्क शिक्षकाने 3 मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या तक्रार पेटीत प्राप्त झाली आहे.
अधीक्षकांनी जिल्ह्यात तीनशे तक्रार पेट्या विविध ठिकाणी सुरू केल्यात. यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तात्काळ या विषयाची दखल घेऊन शिक्षक संजय नागे विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला गजाआड केलं आहे.
तर दुसरीकडे धामणगाव रेल्वेतील दत्तापुर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील काही महिन्यापासून अत्याचार करीत असल्याने पीडितेने दत्तापुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढत असल्याने याला आळा बसावा याकरिता आपल्या पाल्याची सुरक्षित काळजी घेणे गरजेचे आहे असे आव्हाहन पोलीसांकडून करण्यात आलंय.