लॉकडाऊनदरम्यान ३५ कुटुंबियांना पोलिसांनी पुरवला किराणा माल

कोरोनाने सर्वाना घरी बसण्यास भाग पाडले,मात्र ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यानीं काय करायचे? अशातच वर्दीतली माणसं धावून आली आहेत. एकीकडे 24 तास बंदोबस्त, घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या खाकीचे दर्शन मात्र आज वेगळे पहायला मिळालं.
अन्न पाण्यावाचून भुकेली काही घरे निगडी परिसरात अण्णाभाऊ साठे येथे असल्याची माहिती निगडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंसार शेख यांना मिळाली. ते ताबडतोब आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे गेले. दोन दिवसांपासून उपाशी लोकांचं घर गाठून त्यांनी कुटुंबांना किराणा माल भरून दिला.
गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला 35 कुटुंबियांना पोलिसांनी किराणा माल दिला. पोलिसांची लॉकडाऊन काळात वेगळी छाप पडत आहे. बाहेर पडणाऱ्या लोकांना दांडुक्यांचे फटके देणारे असं चित्र पोलिसांचं निर्माण केलं जात आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात असेही पोलीस अधिकारी आहेत, ज्यांचात माणुसकीचा झरा आजही कायम वाहतोय. अशा या पोलीस अधिकारी आणि कर्मचऱ्यांना जय महाराष्ट्रचा सलाम.