Fri. Apr 23rd, 2021

गुटख्याच्या दरोड्यात पोलीस कर्मचारी सहभागी !

पोलीस कर्मचारी दरोड्यात सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. हा पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्तीस आहे.

काय घडलं नेमकं?

दरोडा नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात एका गोडाऊनवर टाकण्यात आला होता.

पोपट मुरलीधर गायकवाड असं या पोलीसाचं नाव आहे.

या घटनेनंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दरोडा टाकल्यानं खळबळ उडाली आहे.

निघोज येथे एका गोडाऊनवर दरोडा टाकुन पाच लाख रुपये किंमतीचा गुटखा चोरण्यात आला होता.

त्यानंतर या गुटख्याची परस्पर विक्री करण्यात आली.

गोडाऊनच्या परीसरात संबंधित व्यापाऱ्याने CCTV बसवले होते.

त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याचा दरोड्यातील सहभाग पुढं आला.

दरोड्याच्या वेळी गायकवाड हा पोलीस कर्मचारी तिथं उपस्थित असल्याचं CCTV मध्ये उघड झालं.

गुन्हेगारांशी संधान, बेकायेशीरपणे गोडाऊनचं कुलुप तोडून गुटखा चोरणं आणि त्याची परस्पर विक्री करणं आणि वरिष्ठांच्या परवानगी शिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन बेकायदेशीर कृत्य करणं या कारणांमुळे गायकवाडला निलंबित करण्यात आले आहे. तर नगर पोलीसांनी गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *