Tue. Sep 29th, 2020

पतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग!

पिंपरी-चिंचवडमध्ये थेट पोलिसानेच विवाहित महिलेचा विनयभंग केलाय. राजेंद्र पालवे असं त्या पोलिसाचे नाव असून तो साने चौकीत कार्यरत आहे.

पीडित महिला 10 ऑक्टोबर ला पती विरोधात तक्रार द्यायला आली होती. तेंव्हा पालवेने “मी आहे, घाबरू नका” असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता मुलाच्या नंबरवर फोन करून, आईकडे फोन द्यायला लावला. विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला. मग आज पीडित महिलेने पालवे विरोधात चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. तदनंतर हा गुन्हा दाखल झालाय.एएसआय पदावर पालवे असून त्याचे 56 वय आहे. तर पीडित विवाहितेचे 36 वय आहे.

एकीकडे विविध क्षेत्रातील महिला आपल्यासोबत होणाऱ्या विनयभंगाबद्दल #MeToo द्वारे आवाज उठवत आहेत, त्यासाठी पोलिसांकडे तक्रारी दाखल करत आहेत, अशावेळी सामान्य महिलेचा जर पोलीसच अशा प्रकारे विनयभंग करत असतील, तर सामान्य महिलांनी कोणाकडून अपेक्षा करावी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *