Thu. Jan 20th, 2022

रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा

  मालेगावात शुक्रवारी झालेल्या दगडफेकी प्रकरणी आता बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी ही संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. स्थानिक पोलिसांनी सोमवारी रात्री संघटनेच्या लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारीत दोन तास झडती घेतली. झडतीत बंदचे आवाहन करणारी पत्रके व दस्तावेज जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे अन्य धार्मिक संघटना हादरल्या आहेत.

  त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमी संघटनेने बंदची हाक दिली होती. दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागले. अचानक दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्याने संघटना संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पोलिसांनी पंचासमक्ष कार्यालयाचे कुलूप तोडून झडती घेतली. कार्यालयातील संगणक, रजिस्टर, धार्मिक पुस्तके आदिसह बंदचे आवाहन करणारी ऊर्दू भाषेतील काही पत्रके पथकाच्या हाती लागली आहेत. यासह एक रजिस्टर व काही पुस्तके चौकशीकामी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

  तसेच मालेगावमधील दंगलीप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. मालेगावमध्ये दंगल घडवून आणण्याचा काही संघटनांचा कट होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *