Sun. Nov 29th, 2020

घरावर धाड टाकत पोलिसांकडून 2.35 लाखांचा गुटखा जप्त

राज्यात अमली आणि तबांखूजन्य पदार्थाची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतच्या अनेक घटना वारंवार उघडकीस येतात. अशा घटना समोर आल्यावर महाराष्ट्र पोलिस यावर त्वरीत कारवाई करून आरोपींना ताब्यात घेते. मात्र या पदार्थाच्या विक्रीवर याचा काही परिणाम पडत नसल्याचे चित्र पहायला मिळते. या पदार्थांच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान नुकतीच अमरावतीमधील एका घरातून गुटखा विक्रीची घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून ग्रामीण पोलीसांनी बुधवारी कोर्ट रोड परिसरातील सिंधी कॉलनीत एका घरावर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी २.३५ लाखांचा गुटखा पकडला असून त्यातील आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.

प्रकाश बजाज व गोपाल तेजवानी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाड्यातील सिंधी कॉलनीत तंबाखूजन्य गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या कडे आली.

त्यावरून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून सदर कारवाई केली आहे. आरोपीच्या राहत्या घरात २५ कट्टे मुद्दे माल मिळून आला. त्याची किंमत २ लाख ३५ हजार रूपये आहे.

पोलिसांनी या गुटख्याचा साठा जप्त करून कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पाचरन करण्यात आले आहे. याबद्दलचा अधिक कसून तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *