Fri. Dec 3rd, 2021

‘चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व राज्यांना केंद्राची मदत’

गुजरातमधील चक्रीवादळातील ग्रस्तांना केंद्राची मदत जाहीर झाल्यानंतर एकच गदारोळ निर्माण झाला. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी यावर टीकासुद्धा केली. पंतप्रधानांवर होणाऱ्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्व राज्यांना केंद्राची मदत मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाआहे.

‘केंद्र सरकारनं जी प्रेसनोट काढली आहे, त्यात सर्वच बाधित राज्यांना मदत करणार असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपची सत्ता नाही. तरीदेखील तिथले नेते टीका करत नाहीत, कारण त्यांनी ती प्रेसनोट नीट वाचली आहे.राज्य सरकारला सर्व माहित आहे, तरीदेखील जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे’, अशी टीका फडणवीस यांनी केली.

केंद्राकडून पाहणी करून गुजरात, महाराष्ट्र, केरळसह सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना ही मदत मिळणार असल्याचे ही त्यांनी महाडमध्ये बोलताना स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *