पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी व्हायला पाहिजे ; रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून पूजा चव्हाण या आत्महत्या प्रकरणी चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणात राजकारण करून नये, त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. तसेच या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच या प्रकरणारवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिले आहे. जसे अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात राजकारण करण्यात आले, तसेच या प्रकरणात होऊ नये, त्या मुलीला न्याय मिळायला हवा. या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी, असेही रोहित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन-डे साजरा – आजचा दिवस हा प्रेमाचा आहे. एकच दिवस नव्हे, तर वर्षभर शेतकऱ्यांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज देशात जे घडत आहे. ते अत्यंत दुर्देवी आहे. नवीन कृषी कायदे आणून त्यांचा हक्क मारला जात आहे. कितीही अडचणीचा काळ आला तर लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील पाहिजे. आज प्रेमाचा दिवस आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांबरोबर साजरा करावा म्हणून मी आज येथे शेतकऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्यासाठी आलो आहे, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले. शिवाय शेतकऱ्यांनी रोहित पवार यांचे चांगलेच जल्लोषात स्वागत केलं. पवारांचे स्वागत कांद्याची पात, मेथी , भेंडी देवून स्वागत केलं.