Mon. Jan 17th, 2022

Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ११६वर

कोरोना व्हायरस चीनमधून सर्व जगात पसरला. भारतातले सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दर दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी कोरोना रुग्णांचा आकडा हा ११२ होता. तो आकडा बुधवारी दुपारपर्यंत ११६ इतका झाला आहे. वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या आकड्याची माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोना झाला. या ५ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली. इस्लामपूरमधून समोर आली. यानंतर बुधवारी दुपारी आणखी ४ जणांना कोरोनाची लागण असल्याचं समजलं. हे ४ जणं मुंबईतील आहेत.

तसंच या ४जणांना प्रवासाचा इतिहास आहे. दिलासादायक बाब अशी एकूण कोरोनाग्रस्तांपैकी १४ रुग्ण हे ठणठणीत असून त्यांना डिस्चार्ज देण्याच्या स्थितीत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा सोमवारपर्यंत ९७इतका होता. मंगळवारी कोरोनाचे एकूण १० रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ही १०७वर पोहचली. तर आता ९ रुग्ण सापडल्याने एकूण संख्या आता ११६ इतकी झाली आहे.

दरम्यान आता राज्यातील वाढत असलेला कोरोना रुग्णांचा आकडा हा चिंतेची बाब आहे. मात्र जनतेने घाबरु नये. घराबाहेर पडू नये, असं वारंवार आवाहन केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *