Sat. May 15th, 2021

Corona : आरोग्यमंत्र्यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला भोसरीकरांचा प्रतिसाद

देशावर सध्या कोरोना विषाणूचा धोका आहे. राज्यातही कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या रुग्णांच्या आकडा दीडशेच्या जवळ पोहचला आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांकडे अवघ्या १०-१५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या आवाहनाला राज्यातील जनता सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

पुण्यातील भोसरी येथे तीन दिवसीय रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. पै.अमरभाऊ फुगे युथ फाउंडेशन, जिजाऊ प्रतिष्ठान आणि मृत्युंजय ग्रृपच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचं आयोजन केरण्यात आलं आहे. 

या रक्तदान शिबिरात जनतेला रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. तसेच रक्तदान शिबिर सुरु असल्याची माहिती जनतेला सोशल मीडियाद्वारे दिली जात आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे रक्तदान करण्यासाठीचं आवाहन केलं जात आहे.

या रक्तदान शिबिराला आज (२७ मार्च) सुरुवात झाली. उपरोक्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण ३५ जणांनी रक्तदान केलं आहे.

लॉकडाऊनचं उल्लंघन न करता रक्तदान

सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी एका वेळेस ठराविक लोकांनाच रक्तदानासाठी घेतलं जात आहे. तसेच या प्रत्येक रक्तदात्यामध्ये ठराविक अंतर ठेवलं जात आहे. आवश्यकत ती खबरदारी आयोजकांमार्फत घेतली जात आहे.

रक्तदान करणाऱ्या इच्छुकांना आयोजकांमार्फत टोकन दिले जात आहे. या टोकन नंबरनुसार या इच्छुकांना आयोजतकांना रक्तदानासाठी एक ठराविक वेळ दिले जाते आहे. यामुळे रक्तदात्याला जास्त वेळ त्या ठिकाणी वाट पाहावी लागत नाही. तसेच सोशल डिस्टंसदेखील राखलं जात आहे.

रक्तदानासाठी वाट पाहताना इच्छुक तरुण.

रक्तदान करण्यासाठी आयोजकांमार्फत काही मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर इच्छुकांना आयोजक त्यांची टोकन नंबर आणि निश्चित वेळ कळवतात.

दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. तसेच राष्ट्र सह्योगाचं काम करावं, असं आवाहन या आयोजकांमार्फत करण्यात आलं आहे.

रक्तदान शिबिराचा पत्ता : . पै. धोंडिबा उर्फ गणपत फुगे क्रिडा संकुल ( विरंगुळा केंद्र ) दिघी रोड,भोसरी.

रक्तदान करण्यासाठी संपर्क क्रमांक

विश्वास देशमुख : 7057074959

स्वप्नील अरण्य : 9049313190

सुमित खंडागळे : 7775889052

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *