खड्डेभरणीचे काम निकृष्ट दर्जाचे; मनसे शहराध्यक्षांनी कामगारांना झापले

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असून राज्यातील सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय डोंबिवली दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी दौऱ्यावर असल्याचे म्हटलं जात आहे. राज ठाकरे डोंबिवलीत दौऱ्यावर असल्यामुळे शिळफाटा येथे घाईघाईने खड्डेभरणी केल्याचे समोर आले आहे. मात्र खड्डेभरणीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी लावला आहे.
नेमकं काय घडलं ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी दोन दिवसीय डोंबिवली दौऱ्यावर आहेत.
त्यासाठी शिळफाट जवळ असलेल्या खड्ड्यांना बुजवण्याचे काम सुरू होते.
मात्र काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी लावला.
तसेच खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना झापून पिटाळून लावलं.
डोंबिवलीला दौऱ्यावर येत असताना राज ठाकरे यांना वाहतुककोंडीसह खड्ड्यांचाही फटका बसला.