Sun. Jan 16th, 2022

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे विधान निषेधार्ह – नितीश कुमार

Patna: Bihar Chief Minister Nitish Kumar speaks to the media persons during the Lok Samvad programme at CM's residence, in Patna, Monday, Feb .04, 2019. (PTI Photo)(PTI2_4_2019_000080B)

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी नथुराम गोडसे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे भोपाळचे भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कमल हासनच्या विधानावर प्रत्युत्तर दिले. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपावर टीका केली आहे.

काय म्हणाले नितीश कुमार ?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.

बिहारमध्येही आज मतदान पार पडत असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पटना येथे मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना भाजपावर टीका केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपावर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानामुळे टीका केली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे विधान निषेधार्ह असून त्यांचे समर्थन होऊ शकत नाही.

तसेच त्यांच्यावर भाजपाने काय कारवाई करावी हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे.

मात्र अशाप्रकराचे विधान सहन करणार नाही असे नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

तसेच प्रज्ञासिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करावा असाही सल्ला नितीशकुमार यांनी दिला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *