Fri. Jan 28th, 2022

प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादी नेते विजय शिवणकरांचा भाजपमध्ये प्रवेश

  विदर्भामध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. गोंदियाचे राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला आहे.

  विजय शिवणकर यांनी ७ वर्षांआधी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *