Thu. May 19th, 2022

रायगडावर नमाज पठण

रायगडावर दगडांना पांढरा रंग फासत केलेले बांधकाम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रायगडावर पांढरी भिंत बांधून नमाज पठण करण्यात आले. याविरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडी सरकार चिडीचूप असल्याचे दिसत आहे.

रायगडावर नमाज पठण केल्याप्रकरणी शिवप्रेमी संताप व्यक्त करत असून त्यांनी रायगडावर आंदोलन पुकारले आहे. रायगडाच्या विद्रुपीकरणाची हिम्मत होतेच  कशी? असा सवाल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

शिवप्रेमी आप्पा परब यांच्या वक्तव्यामुळे रायगडावर पांढरी भिंत बांधून नमाज पठण केला असल्याचा सर्व प्रकार उघडकीस आला. आप्पा परब सातत्याने या सगळ्या अतिक्रमणाच्याविरोधात जनतेला जागृत करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.