Fri. Apr 23rd, 2021

संत तुकाराम पालखी सोहळ्याला सुरुवात

संत तुकाराम पालखी सोहळ्याला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. याची तयारी गेली दोन महिन्यांपासून सुरू होती. ही तयारी आता पूर्ण झाली असून आज पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पालखी सोहळ्याचे राज्यातील अनेक भक्तवर्ग देहू आळंदी मध्ये दाखल झाले आहे. मात्र यावेळेस वारकऱ्यांची संख्या कमी आहे. प्रस्थानाच्या दिवशी देहूत पाय ठेवायला जागा नसते. परंतु या पालखी सोहळ्याला यंदा गर्दी कमी आहे. दुष्काळाचं सावट असल्यामुळे गर्दी कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पालखी सोहळ्याचं यंदा 334 वं वर्ष!

श्रीक्षेत्र देहूनगरीतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान होणार आहे.

भक्‍तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत.

तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 334 वं वर्ष आहे.

पालखी सोहळ्याकरिता 329 दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत.

देहूत पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

देहुनगरीत ‘ग्यानबा-तुकाराम’चा अखंड जयघोष सुरू आहे.

सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत आहे आणि भागवत धर्माच्या पताकांनी वातावरण भारावून गेलंय.

काल पावसाचे आगमन झाले आणि वातावरणात गारवा पसरल्यामुळे भाविकही सुखावले.

इंद्रायणी नदीकाठ, मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे.

पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था, भाविकांना सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *