पावसामुळे घटली आवक, भाजीपाल्याचे भाव वाढले!

नाशिक मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे. भाजीपाल्याच्या दरांत काही प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकच्या बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने वांगी,दोडका,भेंडी,गिलके, बटाटा या भाज्यांसाह पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.
नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मुंबईला जातो. त्यामुळे मुंबई मध्ये देखील भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोथंबीर – 30-35 रुपये जुडी
मेथी – 22 – 25 रुपये जुडी
शेपू। – 25 – 28 रुपये जुडी
टोमॅटो – 20-25 रुपये किलो
बटाटा – 15-20 रुपये किलो
वांगी – 30-35 रुपये किलो
दोडका – 30-35 रुपये किलो
गिलके – 40-45 रुपये किलो
भेंडी – 30-35 रुपये किलो
सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्याची आवक वाढून दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.